विषय थोडक्यात :-
“जाणीव ही कथा हल्लीच्या काळात नवरा बायकोच्या करियरचा मान राखून तीला बरोबरीची वागणूक देण्यासाठी धडपडत असतांना, आपल्या परंपरा व स्त्री म्हणून तीला आपल्या गृहिणी पदाची जाणीव करून देते सासू पण घर व संसार हा दोघांचा दोघांनी सावरावा याची जाणीव व समज आई व बायकोला न दुखावता एक मुलगा आपल्या आईला गोड शब्दांची व निर्मळ भावनांची झालर लावून पटवून देतो”*
जाणीव
सकाळची कोवळी व सोनेरी किरणे उघड्या खिडकीतून व बंद पडद्यातुन हळुवार चोर पावलांनी राधाचा गोंडस व निरागस चेहऱ्याचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करावी अश्या अविर्भावात राधा च्या बेड पर्यंत येऊन पोहचले.
हळुवार कूस बदलून तीने हात पसरवून पाहिले तर अक्षय नव्हता शेजारी,घड्याळ पाहिले तर फार उशीर झालेला ,”अक्षय ये अक्षय” चा गजर करत व लांब सडक रेशमी केस सावरत ती हॉल मध्ये शिरली,घरात बागेत गच्चीत कुठेही नाही हे बघता “हा गेला तरी कुठे?” विचार करत तिने आवरायला घेतले.”आज मीटिंग होती निघून गेला की काय ,शी कशी नाही जाग आली मला म्हणत असे स्वतः शी पुटपुटत तर कधी त्याला फोन करत होती पण फोन ही उचलत नाही, शेवटी घरातील शुरॅक मधील शूज वर नजर पडली व अक्षय ऑफीसला नाही गेलाय याची खात्री झाली.
पोह्याचा बेद आखून कढईतील गरम झालेल्या तेलात कढीपत्याची पाने टाकेल तितक्यात बेल वाजली घाई घाईने पाने सोडून तीन दार उघडले तिच्या ओल्या केसात मोगऱ्याचा गजरा माळत अक्षयने तिला विश केले,”लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा राणी सरकार.”
राधा लटक्या रागात,”अरे सरकार वगैर राहू दे, सांगून नाही का जायचे.” आलेला राग कितीही गंभीर असला तरी क्षणांत शांत होण्याची जादू होती राधा मध्ये आणि म्हणून अक्षय नेहमी गृहीत धरतो याची पूर्ण कल्पना होती तीला…
अक्षय,”काय करतेस ग आज,उत्साहात ये ऐक ना राधा,दिवसभर तू किचन मध्ये नको ना जाऊस मला सुपूर्त कर आज च्या दिवस”
राधा,”हसून काय? जमणार आहे का तुला ?”
अक्षय,”जमवेल ग मी तू हो म्हण ना प्लिज”
राधा,”इतक म्हणतोयस खरं म्हणून घे पण आधी मी केलेले पोहे खा आणि मदत हवी तेव्हा आवाज दे.”
दोघांचे पोहे खाऊन झाले, अक्षय किचन मध्ये व राधा परीचे आवरून तिला जॅम ब्रेड देऊन बेडरूम मध्ये लॅपटॉप काढून मेलवर लॅबमधुन आलेले रिपोर्टस चेक करावे ऑपरेशनच्या प्लॅनिंग साठी म्हणून जाऊन बसले.
अक्षय ने राधाला न सांगता कूकिंग क्लास केला होता 1 महिन्याचा व केक च्या काही टिप्स घेण्यासाठी तो मृण्मयी कडे गेला होता मृण्मयी म्हणजे त्याच्याच ऑफिस मध्ये सॉफ्टवेयर इंजिनीयर.
इकडे 5 वर्षात याने 2 वेळ चहा सोडून काहीही केले नाही फार गोंधळ होईल याचा या विचारात राधा जराशी विचलीत होती.
अक्षयच बरंच आवरत आले होते तितक्यात बेल वाजली.
अक्षय,”राधाsssss दार उघडतेस ना हात पिठाचे आहेत माझे प्लिज डिअर
राधा,”हो आलेच मी म्हणत दार उघडले.”
व समोरील व्यक्ति पाहून या इतके बोलून ही घाई घाई किचन मध्ये गेली.
राधा,”अक्षयsssss आई…..आई आल्यात” म्हणत (लगबगीने) त्याच्या गळ्यातील अप्रोन स्वतः चढवत ‘त्याला हात धवुुन घे व निघ म्हटले ना जा तू बाहेर आई चिडतील,  पण हा पठ्ठा एकेच ना……’
पण राधाने विनऊन बाहेर काढले व अक्षय हॉल मध्ये आला.
नमस्कार करून आईशी बोलत असताना
बाल्कनीत खेळत असलेली परी बाहेर येऊन “बाबा अरे तू इथे कसा आला नाही ना जमत तुला फूड बनवायला”
राधा आतच कपाळ बडवते व अक्षयचं त त प प होऊन तो विषय सावरण्याचा प्रयत्न करतो.
पण आईला कळले जे दोघांना लपवायचे होते, कारण प्रधानाकडे पुरुष स्वयंपाक घरचा उंबरा ओलांडत नाहीत, पाणी,चहा, जेवण यांच्या वेळा एकदा सासू किंवा नवऱ्याने सांगितल्या की वेळा लक्षात ठेऊन नवऱ्याच्या मागे पुढे फिरत राहायचे दासी सारखे ही आईची संस्कृती अक्षयला व राधाला ठाऊक होती पण परी ने एका वाक्यात घोळ घातला व आईचा हसरा व प्रसन्न चेहऱ्यावर सचिन आउट झाल्याचे दुःख असावे तश्या छटा पसरल्या……..
आणि अक्षयच्या प्रेमळ इच्छेला अपूर्णत्व येऊन आईची नाराजी पदरी पडली होती, तरी रात्री पर्यंत आईने व राधाने अक्षयचे मन राखत विषय आवरला खरा पण दुसऱ्या दिवशी सकाळी आई रात्रभर प्रधानांच्या मुलाने केलेले कालचे कृत्य आठवत झोपली नसल्याने उशिरा उठली अंघोळ वगैरे आवरून आई हॉल मध्ये येताच राधा चहाचा कप घेऊन येताना पाहून आईने विषयाला पुन्हा हात घातला.
आई,”अक्षय आहे आत किचन मध्ये?”
राधा,”नाही हो आई असे का विचारले?”
आई(खोचक पणे),”नाही सकाळी उठून परीला डब्बा ही करून देत असेल तो असे वाटले.”
राधा,”हसून व शांतपणे आई तुमच्या बोलण्याचा कल कळतोय पण खरंच असे नाहीये ओ अक्षय कधी कुठे काही करतो का? आणि तुम्हाला दिलेला शब्द मी चाकोरीत पाळतेय आई बायको म्हणून जगण्याचे नियम आपल्या घरचे लक्षात आहेत हो, काल लग्नाचा वाढदिवस म्हणून उगाच तो किचन मध्ये गेला आणि नेमके तुम्ही पाहिले.
(“राधा ही MS सहज उलटून उफरट बोलू शकली असती पण तिला संवाद हवा असतो विसंवादाकडे कल गेला की मौन बरे अशी ही”)
आई(नाराजीने लांब श्वास घेत),,”पाहिले मी काल.”
अक्षय बेडरूम मधून बाहेर येत,”आई मला सांग बाबानी कधीच तुला मदत केली नाही तू घर नोकरी पाहुणे रावळे सर्व नीट केले अगदी त्रास झाला तरी तु मुकाट सहन केल पण खरं सांग हे सर्व होतांना तुला बाबांनी मद्दत करावी ही इच्छा खरंच नाही झाली का ग?”
आई,”अक्षय ssss…! तुला काय म्हणायचे आहे ?”(आई चिडली)
अक्षय,”आई मी तुला खूप दमतांना पाहिलंय सर्व राबता स्वतः आवरताना आणि मन मारताना पाहिलंय असे राधा च्या वाटेला येऊ नये असे मला वाटते…..जसे तुझ्या सारखे घर व नोकरी इतकेच चाकोरीतल जीवन न जगता जीवनाचा आनंद ताईच्या वाटेला यावा असे तुला वाटते.”
आता विषय स्व:वर आला होता आई न बोलता निघून गेली आत व राधा अक्षयला थोडं चिडत पण हळुवार आमचे आम्ही सावरत होतो ना विषय, का उगाच मध्ये पडलास व भांडणाचा स्वर चढला.
अक्षय ऑफिस ला गेला राधा ही हॉस्पिटला निघाली थोड्या वेळात किचन मधील व परीचे आवरून, आज डे केअर ला सुट्टी म्हणून परी ही खुश होती.
सायंकाळी अक्षय घरी येताना 2 गजरे आणतो मोगऱ्याचे
आई दार उघडून आलास राजा बस चहा टाकते.
( आई किचन मध्ये जाण्यापूर्वीच)
अक्षय,”आई थांब पिन काढून गजरा माळतो आईच्या केसात.”
आई हसते सकाळचे वादळ जाऊन सर्व विवळले असेच नहोते पण होते ही वागण्यात….
अक्षय,”तू बाल्कनीत जाऊन बस आई मी आलोच चहा राहू देत.”
आई जाऊन बसते
अक्षय 2 कप चहा घेऊन जातो समोर आणि आईला म्हणतो “बघ कसा झालाय?”
आई(सकाळचा स्वर परत धरून), हम्म आहे छान पण लग्न तुझं आम्ही तू चहा करावा म्हणून का रे करून दिले होते….?”
अक्षय चहा आईला देऊन व आपला कप घेऊन तो खाली आईच्या खुर्ची पाशी आईच्या मांडीवर डोकं ठेऊन बोलतो,”आई मला तुला काही सांगायचे आहे.”
आई,”बोल ना !”
अक्षय,”आई फार वाईट वाटते गं आपल्या पुरुषी परंपरा जपताना आणि आजीच्या भीती पोटी तुला समजून नाही घेता आले बाबांना आणि मला ही पण आई तु दमलीस राबलीस सर्वासाठी जे मी किंवा बाबा तेव्हा नाही करू शकलो ते आज तुझ्या साठी किंवा राधा साठी करावे वाटते त्यात काय चूक गं?
“आई राधा डॉक्टर आहे,तीला घर व हॉस्पिटल व्यतिरिक्त जगणं माहीत नाही घर माझ्या मुळे जितकं तितकंच तिच्या मुळे उभे आहे मग माझी जबाबदारी ती विनातक्रार घेते तेव्हा तुझा तू माझ्यावर केलेल्या संस्कारातील एक नियम मी पाळतोय किंवा प्रयत्न कतोय “माणसाने माणसाशी माणसा सारखे वागावे” चुकलो का ग?आई फार दमते ती पण(स्पॉज घेत)तरी तुला दिलेला शब्द तुझ्या अपरोक्ष पाळते,घरचेच जेवण, तू व तिच्या आईने शिकवल्या परी नवीन अनेक डिश ती घरी येऊन स्वतः रात्री बनवते, न कसला गर्व ना अहं, आपली माणस खुश तर मीही खुश या एका नियमाने हसून सर्व करते, आणि तिचा गोड चेहरा व टॅलेंट व्यतिरिक्त या स्वभावावर मी जिवापाड प्रेम करतो…..”,
“तुम्ही आई लोक ना मुलींना ऑल राउंडर बनवता आणि आम्हा मुलांना घराचा कणा असलेल्या स्वयंपाक घरा पासून तोडून का गं टाकता???”,
“आई खरं सांगू तुझे हातचे जेऊन मोठा झालो राधा खूप छान जेवण बनवते पण तुझ्या हातची चव थोडी तीला थोडी मला दे ना गं ! आई माझ्या हातचे पदार्थ बनवून तुला जेवून तृप्त झालेले पाहावे वाटते, ही भावना चुकीची आहे का ?”
“आणि आजीची प्रधानांची परंपरा जपायला प्रधानांच्या ह्या म्हणजे तू व राधा अश्या दोन पिढयातील बायका आहेत कां आधी सारख्या घर व मूल संभाळणाऱ्या? मग सोड की हा हट्ट……आईssss पटतंय का ग?”
आई : (गदगद होत,पदराने डोळे पुसत)हो रे बाळा खरय तुझे म्हणने.” आई अक्षयला उठवते दोघे मायलेक किचन मध्ये येऊन रात्रीच्या जेवणाची तयारी करायला घेतात मस्त गप्पा मारत आई रेसिपी समजून सांगत असतांना राधा घरात येऊन किचन च्या दारातून झालेला बदल आ वासून बघते.
आई राधाचा हात आत ओढत म्हणते अहो डॉक्टरीणबाई या आत तुमच्या नवरोबाचे ट्रेंनिग सुरू आहे कूकिंगचे तुम्हाला ही काही पारंपरिक पदार्थ शिकायचे होते ना या फ्रेश होऊन आत…….
लहानशी परी येऊन आजीची साडी ओढत ,”आज्जी मला गं कोण शिकवेल?”
आई हसत नातीला उचलून गॅस ओट्यावर बसवंत,”शिकवेल की मीच तुझ्या बाबा आणि आई सोबत तुला ही.”
राधा,”अक्षय कडे ही काय जादू म्हणत प्रश्नार्थक कटाक्ष टाकते.”
अक्षय आई समोर गजरा पुडीतून काढून राधाच्या केसात माळत डोळ्याच्या इशाऱ्यावर सर्व ओके म्हणत done करतो.
राधा ने आईचा राग काढण्यासाठी आणलेले बटर स्कॉच आईस्क्रीम 4 वाटीत घेऊन पूर्ण परिवार आईच्या तालमीत सुग्रास जेवण शिकायला तयार होते व सर्वाच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटते व राधा राष्ट्र पातळीचा प्रश्न सुटल्या सारखी हुश्श करत हसून आईला मिठी मारत सुखावते…….
सारांश : इच्छा असेल तरच मार्ग दिसेल
समजून घेता येते पण योग्य पध्दतीने प्रेमाची झालर लावून समजवणे जमले की सर्व सूर मना सारखे लागतात, नातं दोन मनांवर चालते एक समजून सांगणार व एक समजून घेणार …..
मानसी महेश पाटील.
पुणे (खान्देश कन्या)

Leave a Reply

Your email address will not be published.