हॉस्पिटल मधल्या वेगळ्या दशा
मनातील व्यथा सांगू कशा?
सुरुवातीला आपली व्यक्ती म्हणून ओळख होई,
खाटेवर आल्यावर त्याचा नंबर होई।।
मग येता जाता नंबराने ओळख सांगे,
मनी त्याचे व्रण कोणी सोसावे।।
दिन रात तीच मशिने, त्यांचे आवाज आणि रुग्णांचे रडणे
नको वाटते ते जीव घेणे जगणे।।
जीवनाचा अर्थ खूप उशिरा उमगु लागे
वाटे बाहेर येऊनी पुनश्च हरी ओम करावे।।
नाकी तोंडी कोंबी नळ्या, हाती सुया टोचून घ्या
जीवनातील अरक सारा इथेच येऊन संपला।।
खेळ जीवनाचा अर्थ मला तर आधीच होता कळला
एक मात्र धागा आहे जीवन आणि मरणाचा।।
डॉक्टरांच्याच हाती असते सर्व काही
रुग्णाला नका टाकू कधी व्हेंटिलेटर वरती।।
देहात त्या असते धडधडणारे हृदय,
श्वास संपता राहते बॉडी म्हणून शिल्लक।।