यशस्वी मनोगत

लोकांनी आपल्यासाठी निवडून दिलेल्या माणसांची हजेरी जेव्हा लागते आणि त्यांच्या कामाची यशस्वी पावती जेव्हा समोर येते तेव्हा आपल्या मतदानाचा योग्य उपयोग झाल्याचे समाधान आपल्याला मिळते.पण जेव्हा तीथे राजकारण केले जाते, लोकशाहीची मुस्कटदाबी होते तेव्हा रक्त उफाळून येते. बंद, घोषणाबाजी, निदर्शने करून हे सुटणारे नसते त्यासाठी आत्मा स्वच्छ असावा लागतो. दुसऱ्या प्रती एक ममत्वाची, प्रेमाची आणि जबाबदारीची जाण असावी लागते. पूर्वीपासून आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणूनच भारत देश सर्वात महाग आणि लोकप्रिय देश आहे. इथे मानले गेले तर गरिबातील गरीब माणूस सुद्धा पैशाने नाही तर मनाने खूप श्रीमंत आहे. स्वतःच्या भाकरीतील एक भाग आपण खाऊन तीन भाग दुसऱ्याला भरवण्याची ताकद आणि इच्छा आहे.

देशाला सर्व पातळीवर नेण्यासाठी अथक परिश्रम केले जातात हे आपण पाहतो पण माणसाच्या मूलभूत गरजा” रोटी कपडा और मकान” हे सर्वांना मिळणे तितकेच गरजेचे आहे. दैनंदिन गरजांसाठी पैसा लागतो, पैसा कमावण्यासाठी कामधंदा मिळणे अत्यंत गरजेचे आहे शैक्षणिक व्यवसाय कसा करायचा त्यासाठीचे पायाभरणी पासून कळशापर्यंतचा सर्व डोलारा म्हणजे अभ्यास, माहिती, प्रशिक्षण ,मदत ,मार्गदर्शन वेळोवेळी विद्यार्थ्यांना दिले गेले तर ती मुले दहावी चे शिक्षण पूर्ण करता करता किंवा ग्रॅज्युएशन पदवी घेताना एक यशस्वी उद्योजक /उद्योजिका म्हणून स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात. स्वतःबरोबर आणखी पाच दहा जणांचे पोट भरण्याची क्षमता जेव्हा त्यांच्यात येईल पहा आपला भारत देश बेरोजगारीच्या प्रश्नाने त्रस्त होणार नाही.

आज आपण हजारो वडापाव, चायनीज, पावभाजी, पंजाबी, कोकणी ,साउथ इंडियन स्टॉलची रेलचेल रस्त्यावर पाहतो. प्रत्येकाने जिद्द ,मेहनत , कष्ट आणि आपल्या कामात प्रामाणिकपणा ठेवला तर या देशातील सर्वांना स्वावलंबनाने जगता येईल. मोठ्या पदांवर बसलेल्या अधिकाऱ्यांनी आपल्याबरोबर योग्य विचार विनिमय करून लोकांसाठी काम करत राहिले पाहिजे. मला तरी असे वाटते. तुम्हाला काय वाटते? सांगा हा…….

भेटूया पुढच्या लेखात. धन्यवाद

One thought on “यशस्वी मनोगत”
  1. यशस्वी मनोगत ह्या लेखातून फार कही.शिकण्यासार्खे आहे. अतिशय practical लेख आहे हा. आप्ल्या जीव्नात आपल्याला जर यशस्वी व एक उत्तंम मानुस बनण्यासाठी आपल्याला मेहनत, कष्ट, प्रमाणीकपणा असने किती गरजेचे आहे हे या लेखात कवियित्री साधना अणवेकर यानी फार सहजतेने लिहिले आहे. छोटा लेख पंण त्यात फार काही शिकवंण आहे. सुन्दर

Leave a Reply

Your email address will not be published.