सावरू पाहे मन माझे झुंजार रुपी ह्या जीवनाच्या प्रवाही
लाटा अनंत येती मला मागे ओढण्या साठी
आयुष्यभर केले जे मी संचित
पुण्य कर्मे जाई ते माझ्याच झोळीत
एकदाची हाक आईची माझ्या स्वप्नी
मायेचा खंबीर हात देती बाबा माझ्या डोई
वास्तल्याचे ऋण ते फेडीता आयुष्य पुढे जाई
आहे माझे गुपित माझ्याच उदरी
जीवनाच्या वाटेवरती आज कुठे उभी मी
वास्तव आहे समोर पण झुंज देणार मी