queen elizabeth

देवाने सर्वांना त्यांच्या क्षमतेचे अधिकार दिलेले आहेत. आपण ज्या पद्धतीने वागतो, काम करतो त्या प्रत्येक गोष्टी साठी एक कर्तव्य म्हणून आपण पहात असतो. घरातील गृहिणी तिला मिळालेल्या अधिकाराचा वापर करूनच घर चालवते. ऑफिस मध्ये त्या त्या पदावर असलेली नोकरदार माणसे मिळालेल्या सूचनांचे पालन करत असतात. कर्तव्य जपताना सर्वांच्या मनाचा विचार करून वागणे इतके सोपे नसते. कोणालाही कोणाच्या मनाचा हिरमोड करण्याचा किंवा त्याच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार नसतो. आपली मते ठामपणे सिद्ध करताना त्यातील तत्वनिष्ठ दृष्टिकोन समजून घेणे आणि तो दुसऱ्याला त्याच प्रखरतेने समजावून सांगणे हे खूप जिकिरीचे काम असते.

देशाला सर्वांच्या सहमतीने उत्कर्षाच्या दिशेने नेण्याचा अधिकार जसा पंतप्रधानांना असतो तसा प्रत्येक नागरिकाला सुद्धा असतो. आपापल्या हद्दीमध्ये समाज उपयोगी कार्ये पार पाडताना त्यात विद्रोहाची ठिणगी पडायला न देणे हेसुद्धा एक अग्निदिव्यच असते. आपण ज्या समाजात राहतो त्याचे देणे लागतो आणि त्या प्रमाणे प्रत्येकाने वागले पाहिजे. आपल्या देशात लोकशाही आहे पण इंगलंडमध्ये घराणेशाही आहे. त्यांच्या राणीच्या निधनानंतर घराणेशाही पुढे चालू आहे. त्यांच्या मुलाला आता तो अधिकार प्राप्त झाला पण त्यासाठी किती वर्षे वाट पहावी लागली. एका स्त्रीने इतकी वर्षे सत्ता गाजवणे ही सोपी गोष्ट नाही. आपल्याला प्राप्त झालेल्या अधिकाराचा योग्य तो वापर करणे आणि त्या संधीचे सोने करणे ही एक कला आहे आणि ती आपल्या भारत देशाने करून दाखवली आहे. इतकी वर्षे परकीय नावावर असलेला पथ देशासाठी आहुती देणाऱ्या क्रांतिवीरांना स्मरून कर्तव्य पथ झाला ह्यातच सर्व काही आले असे मला वाटते. तुम्हाला काय वाटते? सांगा हां.

भेटूया पुढच्या लेखात.

धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.