दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पावसाळा सर्व सजीव सृष्टीला आनंदित करत आहे. तर या श्रावण आणि पावसाच्या दुहेरी संगमाचा मेळ साधत स्वयंसिद्धा फाउंडेशन घेऊन येत आहे ‘श्रावणी काव्य स्पर्धा‘
स्पर्धेसाठी कवितेचा विषय निसर्ग श्रावण आणि पाऊस हा असेल. कविता ही स्वलिखित असावी. स्पर्धेसाठी कविता दिनांक 10 ऑगस्ट २०२३ पर्यंत 8108921295 या नंबरवर व्हाट्सअप कराव्यात. स्पर्धेचा निकाल 15 ऑगस्टला आमच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
सहभागी स्पर्धकातून तीन विजेते स्पर्धक निवडण्यात येतील. सहभागी सर्व स्पर्धकांना संस्थेतर्फे सहभाग सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल तर 3 विजेत्यांना प्रशस्तीपत्र देण्यात येईल व त्यांच्या कविता आमच्या संकेतस्थळावर व समाज माध्यमांवर प्रकाशित करण्यात येतील. संस्थेच्या परीक्षक मंडळाचा निर्णय हा अंतिम राहील.
उमंग मंच, स्वयंसिद्धा फाउंडेशन