स्त्री हीच जगाची उत्पत्ती स्थान आहे निसर्गाने स्त्री ला मातृत्वाचे वरदान बहाल केले आहे. मनुष्याचा जन्म त्याच्या आईच्या गर्भातून होतो. स्त्री ही आदी शक्ती आहे. स्त्रीच्या सहनशीलतेची तुलना आपण निसर्गातील कुठल्याही जीवाशी करू नाही. भारतीय स्त्री ही जगातील इतर देशांतील स्त्रीयापेक्षा वेगळी ” आणि या अतुलनीय आहे. भारतातील पारंपारीक स्त्री ही तिच्यातील सौदर्य, कारुण्य, पोशाख, चालीरिती, रिवाज तिची प्रणाली सर्वश्रेष्ठ मानली जाते भारतीय स्त्री तिने परिधान केलेली साडी, कपाळावर लावलेले कुंकू, केसात माळलेला गजरा, आभूषणे, तिची शालीनता आणि नात्यामधील अतूट बंधने जपणारी आहे. भारतीय स्त्री तिच्या पोशाखामुळे स्त्रीचे स्त्रीत्व जपणारी आणि पवित्रतेने भरलेली वाटते
स्त्री ही जन्मताच मुलगी, बहीण, भाई, सून, आजी “अशी अनेक नाती जपणारी असते स्त्रीतूनच सृष्टीची निर्मिती झाली आहे स्त्रीलाच लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वतीची रूपे म्हटले आहे. स्त्री होम मिनिस्टर, शिक्षणमंत्री, आरोग्यमंत्री, अर्थमंत्री अशा संसारीक अनेक भूमिका निभावते स्त्री कुटुंबवस्तल असते स्त्री सुंदर, प्रेमळ, मोहक, नाजूक, शालीन, पवित्र आणि “सहनशील” असते. मुलीचा जन्म झाला की आई-वडिल बर्फी वाटून तीचे बारसं करतात, तिचे संगोपन मुलापेक्षा वेगळे असते, मुलगी शाळेत जाऊ लागल्यावर तीला घेतलेला गणवेश हा मुला पेक्षा वेगळा असतो. तीला फार जपावे लागते. आई-वडिलांना त्यांना आसलेल्या मुलापेक्षा एक सावध आणि जबाबदारी पूर्ण बंधने मग ती सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आपोआपच पडतात.
आपल्या भारतात स्त्री शिक्षणाचा वसा सावित्रीबाई फुले यांनी घातला ही गोष्ट सर्वांच्या परिचयाची आहे. पूर्वीच्या काळी स्त्री या पुरुषापेक्षा क्षुद्र मानून तिला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असे, स्त्री म्हणजे चूल आणि मूल पर्यंतच मर्यादीत होती, आपल्याला सगळ्यानाच माहीत आहे की इतिहासात आपण वाचले की पूर्वीच्या काळी सतीची परंपरा होती, स्त्री अनेक जुन्या रूढी आणि परंपरेने बांधली गेली होती.
पूर्वीच्याकाळी म्हणजे स्त्री साक्षरतेच्या आधी, स्त्रियांवर अत्याचार, हुंडाबळी अशा सामाजिक व्यवस्थेमुळे स्त्री मृत्यूचे प्रमाण अधिक असायचे. आजही वर्तमानपत्रात असे किस्से आपण वाचतो, पण इतिहासात झालेल्या अत्याचारापेक्षा निश्चित कमी आहे. मुलगी वयात आल्यावर तीच्यातील होणारे शरिरक आणि मानसिक बदलामुळे तिच्या समाजातील व्यवहारात वावरताना जाणवते. आनंदाची गोष्ट म्हणजे आजची स्त्री साक्षर असल्यामुळे आधुनिक जगात, संगणकीय जगात आत्मविश्वासाने वावरताना आढळते. झाशीची राणी लक्ष्मीबाई अहिल्याबाई होळकर, मदर टेरेसा, इंदिरा गांधी, सरोजिनी नायडू अशांच्या कथा आपण इतिहासात वाचल्या आहेत. सुशिक्षित स्त्री आजच्या २१ व्या शतकात पुरुषांच्या पेक्षा पुढे निघून गेल्या आहेत, उदाहरणार्थ पी. टी. उशा, सानिया मिर्झा, सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू त्याच प्रमाणे चित्रपट सृष्टीतील ऐश्वर्या राय बच्चन, सुष्मिता सेन, लारा दत्ता, प्रियंका चोप्रा या जागतिक सौदर्याचा किताब मिळवून देणाऱ्यांचा भारताला अभिमान वाटतो. आजची स्त्री पुरुषांची पदे त्यांच्या ही पेक्षा अधिक कर्तृत्वाने भूषविताना आपण पाहतो या सर्व क्षेत्रात साक्षरतेमुळे यशस्वीरित्या भारताचे नाव उज्वल करताना दिसतात.
स्त्री ही सुशिक्षित असली तरी समाजातील पुरुषांमुळे असुरक्षित आहे, स्त्रीला बंदिनी म्हटले आहे, स्त्रीच्या हृदयी पान्हा, नयनी पाणी हीच, तीची जन्मोजन्मीची कहाणी हे काही विसरता येत नाही, स्त्रीला वाटेवरती काचा ग म्हटलेले आहे ? हे वाक्य पुसणे वाक्य झाले नाही.
जो पर्यंत समाजातील पुरुष घटकांतील वाईट विकृतीचा नायनाट होत नाही, तो पर्यंत स्त्री असुरक्षितच आहे. जो पर्यंत समाजाचा स्त्री कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला जात जात नाही तो पर्यंत तो पर्यंत स्त्री वरील अत्याचार कमी होणार नाही
एक स्त्री म्हणून मी माझे मत मांडते.
सुगधा जगन्नाथ यादव
मुंबई