stories
एक साधू शेठजीकडे भिक्षा मागण्यासाठी जातात परंतु शेठजीच्या एका प्रश्नावर म्हणतात, मी येथे भिक्षा घेण्यासाठी आलो आहे, तुझ्या मूर्खतापूर्ण प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी नाही.
एका प्राचीन कथेनुसार एक साधू भिक्षा मागण्यासाठी एका शेठजीकडे जातात. शेठही धार्मिक स्वभावाचे असतात. शेठजीने एक वाटीभर तांदूळ साधूंना दान केले. शेठजीने साधूला एक प्रश्न विचारू का असे विचारले.
साधू म्हणाले ठीक आहे विचार, काय विचारायचे आहे?
शेठजीने विचाराचे की, गुरुजी मला हे जाणून घ्यायचे आहे की लोक भांडण का करतात? साधू म्हणाले मी येथे भिक्षा घेण्यासाठी आलो आहे, तुझ्या मूर्खतापूर्ण प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आलो नाही.
साधूंचे हे वाक्य ऐकताच शेठजीला राग आला. त्याने विचार केला की, हा असा कसा साधू आहे, मी याला दान दिले आणि हा मलाच उलट उत्तर देत आहे. शेठजीने रागामध्ये साधूला बरेच काही अपशब्द बोलले.
काही काळानंतर शेठजी शांत झाले, तेव्हा साधू म्हणाले- जेव्हा मी तुला काही अप्रिय बोललो तेव्हा तुला राग आला. रागामध्ये तू माझ्यावर ओरडलास. अशा परिस्थितीमध्ये मीसुद्धा तुझ्यावर क्रोधीत झालो असतो तर आपले भांडण झाले असते.
क्रोधाचा प्रत्येक भांडणाचे मूळ आहे. आपण क्रोधापासून दूर राहिल्यास कधीही वाद होणार नाहीत. क्रोधावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा. यामुळे जीवनात सुख-शांती राहते.

Leave a Reply

Your email address will not be published.