पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर आज तिची ड्युटी रात्री पासून चालू झाली. नर्सच्या करिअरमध्ये दिवस-रात्र रुग्णांची सेवा करताना तिला बरे वाटायचे. तिच्या आधीच्या नर्सने तिला मागच्या पाच दिवसांमध्ये काय झाले, कोण दगावले, कोण वाचले, कुणाला काय ट्रीटमेंट आहे याची माहिती दिली. ती युनिफॉर्म घालून वॉर्डमध्ये आली. सी वॉर्ड मध्ये आज एक नवीन पेशंट आलेला होता. निमोनिया झाल्याने त्याला श्वास घेण्यास खूप त्रास होत होता म्हणून त्याला ऑक्सीजन मास्क लावले होते .ए वॉर्डमधील एक वयस्कर बाई दगावल्या चे तिला माहित होते. सर्व वॉर्ड मध्ये जाऊन पाहणी करून ती आपल्या सूचनेप्रमाणे ई वॉर्ड मध्ये जाण्यास निघाली. ई वॉर्ड तिसऱ्या मजल्यावर होता. हॉस्पिटल तसे नावाजलेले पण जरा आडवळणावर बांधले गेले होते .येण्यासाठी एक मोठ्या आमराई तून यावे लागे. आमराई तून सरळ त्यांच्या हॉस्पिटलच्या प्रांगणात होती वाट होती. हॉस्पिटल च्या ॲम्बुलन्स उभ्या असायच्या. उजव्या बाजूला इमर्जन्सी गेट होता त्यातून पेशंटला डायरेक्ट वरच्या मजल्यावर म्हणजे ऑपरेशन वॉर्डमध्ये नेले जायचे. पण आज विचित्रच भासत होते तिला. ती पहिल्या मजल्यावरून या मजल्यावर जिना चढून जात होती पण पाठवून कोणीतरी तिचा पाठलाग करत असल्याचा तिला भास होत होता. मेलेल्या पेशंटच्या हाताला बांधलेल्या नंबर प्लेट चा आवाज येत होता. तिने मागे वळून पाहिले कुणीच नव्हते. लांबलचक कॉरिडॉरमध्ये ती आली. त्या कॉरिडॉरच्या टोकाला ऑपरेशन थेटर, उजव्याबाजुला डॉक्टरांची विश्रांती रूम आणि डाव्या बाजूला नर्सेसची रूम होती. ई वॉर्ड जिना चढताच होता. आज जाऊन ती नर्सेस बरोबर बोलली इतक्यात तिला जाणवले की दरवाजातून तिच्याकडे कोणीतरी पहात आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या काऊंटर वर बसली. तिच्या सोबत असलेल्या नर्सला तिने काही घडले आहे का मागच्या दिवसात असे विचारले त्याबरोबर त्या नर्स चा चेहरा भीतीने काळवंडला. तोंडावर बोट ठेवून गप्प राहा असे तिला सांगू लागली. तिला कळेना काय झाले? आता घड्याळात साडेबारा वाजले होते. वॉर्डमधील छोटी लाईट ठेवून बाकीच्या सर्व लाईट बंद झाल्या होत्या. वॉर्ड चा चा दरवाजा सुद्धा बंद केला होता पण बाहेर कसलातरी आवाज आला म्हणून ती उठून बाहेर गेली बाहेरचे दृश्य बघून तिच्या अंगावर शहारेच आले.
एक पेशंट चे कपडे घातलेली स्त्री रक्ताने भरलेल्या हाताने एका व्यक्तीला ओढत ऑपरेशन थेटर जवळ नेत होती . तिच्याकडे तिची पाठ होती तरी ते दृश्य पाहून तारांबळ उडाली. तिने धावत आत येऊन त्या दुसर्या नर्सला सांगितले. त्या नर्सने परत तोंडावर बोट ठेवून गप्प राहायचा सल्ला दिला. ती धावत परत बाहेर आली पण बाहेर कोणीच नव्हते. ना रक्ताचे डाग ना पेशंट ,ना कसला आवाज…….. सर्वत्र शांतता होती भयाण शांतता … कोणाचेच आवाज येत नव्हते….. अरे इतकी शांतता कशी होऊ शकते? हॉस्पिटलमध्ये रात्रंदिवस गजबजाट चालू असायचा…… आणि आज??? तिने पुढे जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला पण तिच्या सोबत असलेल्या नर्सने तिला ओढून घेतले आणि वॉर्ड चा दरवाजा बंद केला. आत आल्यावर तिने सांगितलेला भयानक प्रसंग ऐकून अंगावरती शहारे आले. दुसऱ्या मजल्यावरच्या डी वर्ड मधील पेशंट खूप आजारी होती. तिच्या पोटातले अपेंडिक्स फुटून सर्व शरीरात पू पसरला होता. तातडीने ऑपरेशन करणे गरजेचे होते पण तिचा नवरा त्यास तयार नव्हता. विक्षिप्त माणूस होता तो , आपल्या बायकोची जरा सुद्धा काळजी नसलेला असा माणूस होता तो, पैशाच तर नावच नको डॉक्टर ने इमेर्जन्सी केस सांगूनही तो ढळला नाही . काय करायचं ते करा तिचा वैताग नको असे म्हणू लागला. ती पेशंट बिचारी कावरीबावरी होऊन बेडवरून वरूनच हाताने विनवण्या करत होती पण त्याने ढुंकूनही पाहिले नाही आणि त्या रात्री ती मरण पावली. सर्व रक्त तोंडाद्वारे बाहेर आले होते. रात्री दीड वाजता ती मेली आणि त्याच दिवशी तिचा नवरा सुद्धा रोड एक्सीडेंट मेला. कसा मेला ते एक गुपितच राहिले.
निर्मनुष्य असलेला आणि एक पण गाडीची वर्दळ नसलेला रस्ता क्रॉस करताना अचानक कुठून तरी गाडी आली आणि तो उडाला ती गाडी सुद्धा अद्रुश्य झाली. त्याचाच देह ती ओढत ऑपरेशन थिएटर जवळ न्यायची पण आत प्रवेश करत नव्हती. तिचा आत्मा असाच भटकायचा कॉरिडॉर मध्ये रात्रीचा त्या दिवसा पासून……. हे ऐकून ती जाम घाबरले आपली ट्रान्सफर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये करून घेतली. तिथे तिला फोनवरून तिच्या सोबत असलेल्या त्या नर्स चा रात्री दीड वाजता अचानक मृत्यू झाल्याची बातमी समजली. आपण म्रुत्यु च्या दाढेतुन सुटलो हाच विचार करून ती नव्या ठिकाणी रुजू झाली.
____सौ. साधना अणवेकर
अतिशय छान लेखन साधना ताई