लिहीवत नाही, बोलवत नाही काहीच कुणाला सांगू नये
न जाणो कुठून माझ्या एखाद्या शब्दाला लागायची निषेधाची किनार
आणि भडकून उठायच्या सामाजिक नीतिमत्तेचा ठेका घेतलेल्यांच्या भावना
तिकडे अफगाणिस्तानात पहा कशा चिरडल्या जात आहेत बायका!!!
तुम्हाला किती स्वातंत्र्य आहे! नशीबवान समजा तुम्ही इथे आहात?
कुठे काही बोलूच नाही कुणाला तोंड दाखवूच नये खोल खोल शिरत जावे आपल्याच कोषात
तिथे तरी निदान सुरक्षित राहू आपण
न जाणो कोणती हालचाल कोणता सुर कोणता श्वास कोणाला कधी, कुठे खुपेल,रुतेल????
की असं करावं अख्ख्या स्त्री जातीनेच कुठे तरी गायब होऊन जावं
नको- नको, आम्ही एवढ्या खराब आहोत ,तुमच्यासाठी ओझेआहोत नकोच ना मग असणे
न जानो आमचे असणेच आमचा अपराध ठरावा. …..
कल्पना उबाळे

Leave a Reply

Your email address will not be published.