घेऊनी तान्ह्या बाळा उन्हात बसली माऊली
वातानुकूलित ऑफिस मध्ये बसणार्यांच्या डोळ्यात अंजन घाली
पै पै साठी झटणार्यांना का तुम्ही तडपवता?
लाखोंच्या गाड्या मधूनी फिरणाऱ्यांनो का असे वागता?
रोजगारीवर पोट ज्यांचे, महिन्याच्या पगारावरचे घरटे
दाणा दाणा वाचवताना डोळ्यात अश्रू त्यांच्या दाटे
समसमान वागवा सर्वांना दया त्यांनाही मदतीचा हात
हा जन्म क्षणभंगुर रे मानवा साठव आत्ताच पुण्य संचित
प्रश्न आहे अनंत रोजचे आणि काळ तो अल्प आयुषी
जगणाऱ्यांना तरी जगू द्या, मरून गेल्या कितीक वल्ली
सत्ता सत्ता करणाऱ्यांनो खुर्चीवरचा खेळ तो विचित्र
होऊ नका कोणाचे शत्रू आपुलकीने व्हा सर्वांचे मित्र
दान द्या प्रेमाचे, अन्नाचे ,विश्वासाचे, सुख स्वप्नांचे
गरिबांना करू नका आणखी गरीब मागणे हेचकळकळीचे.
कवियत्री– सौ.साधना अणवेकर