ego

नुसता सध्या अहंकार वाढतोय
आपल्या हातात समाज माध्यमाचे शस्त्र आहे त्याचा वापर करून आपण कुणाच्याही सुखाला सहज नख लावू पाहतोय
म्हणूनच वाटतय सध्या अहंकार वाढतोय
याचेही खरं वाटतंय त्याचेही खरं वाटतंय
नेमकी आपण कुठले डावे की उजवे, अलीकडचे की पलीकडचे यातच जीव गुदमरतोय
पण आपण कोणीतरी महान हे मात्र नक्की आहे.
प्रत्येकच विषयावर आपण व्यक्त झाल्याशिवाय काहीतरी प्रचंड हानी होणार आहे हे मनाला पक्क पटलंय
सकाळी उठल्यापासून मन मात्र जगातल्या सर्व प्रश्नांवर एक चक्कर मारून परत दिनचर्येत गुंतलय
याला पाठिंबा देऊ की त्याचा पाठिंबा काढू
हा शोषित आपला की शोषण करणारा आपला या वावटळीत आपण नेमके कुठले याचा परत परत बट्ट्याबोळ होतोय
पण तेवढे एक मात्र खरं की अहंकार वाढतोय
सर्व विद्वानांची मते ऐकल्यावर मीही कोणीतरी विद्वान असं काहीच न करता मनावर पक्क ठसतय
व्यायामाचे चार व्हिडिओ पाहिल्यावर व्यायाम न करता ही शरीर ताजतवान होतय
आपल्याला प्रत्येक विषयातलं सगळंच कळतंय याची मन ग्वाही देतय
आताशा खरंच फक्त नुसता अहंकारच वाढतोय.

कल्पना उबाळे

Leave a Reply

Your email address will not be published.