घराला घरपण माणसांनी येते,
माणसा विना ते निर्जीव असते
मायेचा हात जेव्हा भिंतीवरून फिरतो,
घराचे सौंदर्या खुलून येते
शेणाया लेपाने घर सारवरताच,
थंड हवेने घर भरून जाते
गोठ्यातील गायी हंबरतात जेव्हा,
गळ्यातील घुंगरांच्या मंजुळ नाद पसरतो
अंगणातील फणसाच्या पारावर बसुन,
फणसाच्या गर्यांचा आस्वाद काही औरच लागतो
चैतन्याने भरलेल्या घराची गुरुकिल्ली आजी जवळ असते,
तुळशीवृंदावन जवळ दिवा लावताना ती तेजस्वी होते
तुप, वरण, सळसळलेला भात, फणसाच्या भाजीचा स्वाद,
जीभेवर अम्रृताचा मस्त मस्त घास
गावच्या घराची ओढ ती भारी,
आनंद आणि प्रेमाच्या रांजणांनी भरलेली

माझे आजोळ ह्या कवितेत कवियित्री साधना यानी आपले सुंदर घर आणी त्या घराला घरपनं देणारी मायेची माणसे यांचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे. खरोखर आप्ल्या घराला घरपनं देण्यासाठी घरातील सर्व माणसे आजी आजोबा वडिल ईत्यदीचे मायेचया हाताची फार गरज आहे त्यानेच आपले घर फुलून येते. आभारी ह्या सुंदर कवितेसाथी.
खूपच छान कविता…. पूर्वी चे दिवस डोळ्या समोर उभे राहिले…..आणि सगळ्यात महत्वाचं आपली संस्कृती जपली ती आपल्या पूर्वजांनीच…..