सुख दिसेना डोळ्यांना

quest for happiness

वणवण जगभर
माणसाची भटकंती,
सुख शोधसि नजर
विचारात पडे अंती ||१||

सर्व काही मिळाल्याने
होई सुखी तनमन,
अशा भ्रमात सदैव
रोज कुंठीतो जीवन ||२||

परि मिळेना शांतता
इच्छा डोंगर वाढतो,
पैशासाठी-सुखापायी
ताण घेऊन धावतो ||३||

स्वतःसाठी नसे वेळ
कष्ट उपसतो फार,
सुख शोधावे अंतरी
डोकावून आरपार ||४||

सुख दिसेना डोळ्यांना
बघे श्रीमंती स्वप्नात,
आयुष्यात अती लोभ
समाधान निर्जीवात ||५||

सुख कशास म्हणती?
प्रश्न सोडवूया आधी,
स्वतःहून मानण्यात
बघ गोष्ट आहे साधी ||६||

©®मनिषा विसपुते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *