मस्तीत जगणाऱ्या एकांड्या शिलेदारासाठी नाहीच यार ही दुनिया
यांना हवी तीच तीच घासून गुळगुळीत झालेली सोपी पायवाट
थोड्याही आडवाटेला भीते यार ही दुनिया
चावून चोथा झालेले विषय उष्टी पत्रावळी उचलण्यातच धन्य आहे ही दुनिया
चघळलेली हाडे परत परत चघळते हाय ही दुनिया
केला प्रयत्न वाटेवर चालावे या दुनियेच्या
शहाण्यासारखी जगायला जमत नाही ग दुनिया
छट् सोडून दे हिला जग मस्तीत
खड्ड्यात गेली ही दुनिया! !!!
कल्पना उबाळे