विठ्ठला विठ्ठला धाव रे आता पाव रे आता,
तुझा धावा करते मदत कर या पामराला,
संसारि या किती दुःख देवा,
मनाच्या चिंधड्या उडती क्षणाक्षणाला,
अपमान सहन करावा तरी किती तो देवा,
आख्खे तारुण्य घातले उभा करण्या या संसारा,
अन आता थकली गात्रे तर विवंचना आली पदरा,
आपलेच करीत की छेद ते हृदयाला
तोडुनी देई क्षणात पूर्ण संबंधाला
नाही होत सहन आता अतिरेक हा झाला,
काय करावे अशा नात्याला जो ना देई मान अस्तित्वाला?
धन्यवाद
कवियत्री:– सौ.साधना अणवेकर