व्यवहार

“रोटी कपडा और मकान” या तीन अत्यंत गरजू अशा गोष्टी आहेत की ज्या पासून आपण आपणास कितीही दूर ठेवले त्याची ओढ ही असणारच आणि आहे.

रोटी चा भाग घेतला तर जिभेच्या असंख्य लाळ सुटणाऱ्या पदार्थांची यादी समोर येते. रोटी म्हणजे गरिबाला एक चतकोर भाकरी सुद्धा अख्या जेवणाचा आनंद देते. पोटाची ती टिचभर खळगी भरण्यासाठी आपणास घाम गाळावाच लागतो घाम गाळल्याशिवाय पैसा नाही. काम नाही तर दाम तरी कसे मिळणार? देशात असंख्य बेरोजगार आजही उपाशी फिरत असतात. प्रत्येकाची दुसऱ्याकडे मागण्याची पद्धत वेगळी, पण ती पोटाची सोय करण्यासाठी करावे लागतात. “अडला हरी आणि गाढवाचे पाय धरी” या उक्ती प्रमाणेच मग मिळणारे कोणतेही काम आपण करणे गरजेचे होते. त्यात आनंद कमी पण कर्तव्यासाठी झटणे आले. मना जोगते काम मिळवणे किंवा मिळणे ही एक उत्तम कला होऊ शकते. स्वतःची कल्पना,स्वतःची मेहनत, स्वतः स्वतःला दिलेले आदेश आणि समुपदेश. आपणच सिंहासनाच्या पदावर बसल्याचा आनंद त्यात मिळू शकतो. अर्थार्जन बऱ्यापैकी होईल मग रोटी बरोबर मख्खन सुद्धा मिळेल ना खायला!!

आपण पाहतो रस्त्यावर गल्ला गल्ल्यांमध्ये कितीतरी वडापाव, सँडविच वाले, जेवणाचे पदार्थ घेऊन बसणारे आहेत. एक आहे म्हणून दुसऱ्याचा धंदा बंद होत नाही. तो स्वतःची आयडिया वापरून धंदा करतो. पण जरुरी पुरते कमावतोच.हीच इच्छाशक्ती सर्वांमध्ये असायला हवी ना? कपड्याचे चार जोड सुद्धा पुरेसे असतात घरात असताना, पण बाहेर जाताना स्वतःला व्यवस्थित अपडेट, व्यवस्थित कपडे वापरणे आणि आचार विचार चांगले ठेवणे हे आलेच.

दिवसातून जरी 100 रुपये मिळाले तरी 20/- रुपये बाजूला ठेवा.30 दिवसांचे20×30= 600/-रुपये होतील ना? किती छान….. आणि आपल्यावर भार पण नसेल जास्त सेविंग करण्याचा. दिवसाला 20/- होऊ शकतात ना? मग हीची एसआयपी चालू करायची. यासाठी ह्या मधले 500/-रुपयाची एस आय पी करायची आणि 100/- रुपये बाजूला ठेवायचे. वर्षानंतर या 100/-रुपयाचे 100×12=1200/- रुपये मिळतील ना? आणि 500/- रुपयांचे बारा महिन्याचे 500×12=6000/- होतील. म्हणजे आपल्याकडे प्रत्येक महिन्याची एक एस आय पी अशा 12(sip) एसआयपी असतील आणि 1200/- रुपयांमधील 1000/-रुपयांची तुम्ही दुसरी एसआयपी चालू करू शकता किंवा म्युचल फंड मध्ये गुंतवू शकता. उरलेले 200/- रुपये एक्स्ट्रा बाजूला ठेवा. पैसे वाढत राहतील ना?

पुढच्या वर्षी परत तसेच करा. हळूहळू पैसे वाढण्यास मदत होते. कशी वाटली कल्पना? मला तर आवडली. तुम्हाला कशी वाटली… सांगा हा….. भेटूया पुन्हा….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *