थाटला संसार मी ही
पुस्तका सोबतीचा
चालला संसार माझा
अगदी सुखाचा
या गोड संसारात
रमण्यात माझा साराच
वेळ गेला
प्रत्येक दिवसाच्या शेवटी
मनी तेव्हड्या
चार ओळी नव्या त्या
देऊन गेला
मी ही द्यायचे
ठरवले मनी
देतांना डायरीच्या पानावरी
शाईचा सुगंध तेव्हडा
दरवळून गेला
या संसारात
सारे जगच माझ्या हाती आले
मी ही असा
साथीदार पसंत केला
– अंजली चिखले