एव्हरीवन कॅन राईट … प्रत्येकजण लिहू शकतो..

रत्तातुली नावाचा एक मूव्ही आहे. त्याच्यामध्ये गुस्तो नावाचा एक स्वयंपाक बनवणारा त्याने तत्त्वज्ञान सांगून ठेवलेल असत की एव्हरीवन कॅन कूक म्हणजे प्रत्येक जण स्वयंपाक करू शकतो… या प्रेरणेतून एक उंदीर स्वयंपाक बनवत असतो आणि त्याची ती पॅशन इतकी जबरदस्त असते की त्याला त्या गुस्तोचा रेस्टॉरंट पर्यंत पोहोचवते व पॅरिस मधील १ नंबर चा उत्तम बावर्ची बनवते .त्याने स्वतःला ओळखलेलं असतं बावर्ची म्हणून, मला हे विचार सगळ्यात जास्त आवडले.

मला असंच माझी जवळची १ व्यक्ती म्हणली कि तू लिही आणि मी लिहू लागले, लेख ,कविता ,चारोळी , कथा.माझ लिखाण लोकांना किती आवडतं किती नाही हा मुद्दाच नाही ,मला आवडलं ,मला आनंद मिळाला, मला हलकं वाटलं , बास…

शब्द हाक मारली की धावत येतात, जसे मी शब्दांच्या प्रेमात पडले तसेच शब्दही माझ्या प्रेमात पडले.. प्रत्येक लिहीणारा वाचणारा ऐकणारा ज्यांच शब्दांवर प्रेम आहे त्यांना शब्द म्हणजे जादू वाटतात ,अंगात सळसळनारी ऊर्जा बनतात, प्रेरणा देतात ,तत्त्वज्ञान सांगून जातात ,कधी आई म्हणून कुशीत घेतात ,तर कधी सखी बनुन मस्ती करतात .. तर कधी ईश्वराच रूप घेऊन येतात.

प्रत्येकजण लिहु शकतो,प्रत्येकाने लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे ,आजच्या कलियुगात माणूस एकटा पडत चाललाय ,कोणाला कोणाशी बोलायला वेळ नाही , शब्दांना गंज चढलाय,माणुसकी संवेदनशीलता कमी होत चाललीये , नाती दुरावत चाललेत व मोबाईल प्रीय झालाय,व्यवहारीपणा वाढत चाललाय, प्रत्येकाच्या आयुष्यात छोट मोठं काही न काही दुःख आहेत, एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे(गीत ).अशामुळे सार काही मनात डबक्यासारखं साचत चाललंय ,त्यामुळे सायको somatic आजार म्हणजे मानसिक ताणामुळे उद्भवणारे शारीरिक आजार वाढत चाललेत..

मनातील निचरा होण्याचा अनेक मार्गपैकी एक मार्ग म्हणजे लिहिणं..

तुम्ही काहीही लिहू शकता लेख लिहा कविता लिहा चारोळी लिहा, कादंबरी लिहा, कथा लिहा.प्रयत्न तरी करा नाही जमलं तर जे काही मनात आहे ते साध्या भाषेत कागदावर बाहेर काढा ,नाही आवडलं तर फाडून टाका ,पण विश्वास ठेवा तुम्हाला खूप हलकं वाटेल .तुमचा एकटेपणा निघून जाईल. शब्द सोबतीला असतील, मन कोणाजवळ तरी मोकळ केल्यासारखं वाटेल.. आणि काय सांगावं तुम्ही चांगलच लीहल तर तुमच्यातून एखादा चांगला कवी ,लेखक जन्माला येईल. प्रत्येक लिहिणारा चांगला कवी ,लेखक असेलच असं नाही पण चांगला लेखक, कवी कोणीही ,कुठूनही असू शकतो….
चला शब्दात रंगुन जाऊया.
एव्हरीवन कॅन राईट
(रत्तातुली चा प्रेरणेतून)
शमा (डॉक्टर स्वाती थिटे)
thiteswati31@gmail.com

One thought on “एव्हरीवन कॅन राईट … प्रत्येकजण लिहू शकतो..

  1. खूप छान संकल्पना आणि नवीन लेखनासाठी प्रेरणा, प्रोत्साहन मिळते. गेली काही वर्षे मी काव्य संमेलनात कविता सादर करण्याव्यतिरिक्त हायकू, चारोळी,चित्र काव्य उपक्रमात सहभागी झाले आहे. लेख लिहीले आहेत व काही प्रसिद्ध झाले आहेत. स्वरचित प्रबोधनपर संहिता लिहीली आहे.
    लेखन शैली उत्तम करायला,कथा लिहायला आवडतील.
    आपला उपक्रम असल्यास मला जरुर कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *