आली कळी उमलून मन मोगरा गंधाळला
देखून तेज माझे कृष्णनभ ओशाळला
नवकांती झळाळते वेढून तनमनाला
अपूर्वाई तेजाची त्या कळलीच ना मनाला
साक्षात्कार गुरुकृपेने प्रसादसम मजला
अलौकिक तेजाचे लाभे आवरण मजला
तेजाळून संसाराचा प्रवास सुखकर होवो
सर्वभूतांसवे हा देह प्रकाशमान होवो.
मानसी काते.
तारे बाईंना समर्पित.