चला करूया आज आगळी वेगळी Shopping,
नसेल त्यात जरुरी Cash अथवा Card Swiping….
मोबाईल घेऊ आज आयुष्याचा,
Data मिळेल ह्यात आनंदी जीवनाचा…
वेळोवेळी Charging करावे संवादाचे,
नाहीतर गरज भासल्यास messages मात्र येतील Low बॅटरीचे…
Install करावे प्रेम आणि आनंदी क्षण,
Delete करावेत मनातले दुःखी कटू व्रण…
राग आणि अपशब्दांना करावे Uninstall,
अक्टिव करावे आनंदी मन फॉर ऑल…
मदतीचे Network नेहमी ठेवावे Available ,
हे नेटवर्क सर्वांसाठी असावे Applicable…
जुन्या गोष्टींनी विचारांची space नका करू full ,
नव्या विचारांचे स्वागत करून नेहमीच रहा Cool…
Free आहे हा आगळा वेगळा मोबाईल आयुष्याचा,
अर्थ उमजेल तुम्हाला आनंदी जीवनाचा…
लेखिका – सौ.प्राजक्ता निखिल चमणकर
ठिकाण – भाईंदर , ठाणे
सौ. प्राजक्ता ची ” आयुष्याचा मोबाईल घेऊ” कविता छान आणि मजेदार आहे.
Kiti chaan rachana ahe 😊
Khup sunder kavita
Khupach chan. ❤️❤️❤️
प्राजक्ता
सुंदर मांडणी
Congratulations
All the best