परस्परावलंबन हे यशस्वी व्यवस्थापन कौशल्याचा अंतर्भुत हिस्सा आहे. एक ठराविक काम ठराविक दर्जा राखून, ठराविक वेळात पूर्ण करणे हे यशाचे गमक आहे. बरीचशी काम एकएकटयाने होण्यापेक्षा गटांनी (team) केली जातात. जिथे परस्परावलंबन अपरिहार्य आहे. आजच्या अधिकाधिक वैश्विक युगात (Global Age) व अधिक गुंतागुंतीच्या कामाच्या स्वरुपाने अशा परस्परावलंबनाची प्रक्रिया अधिकच गडद केली आहे. यामुळे व्यवस्थापनाची प्रत्येक level ने आपल्या वरच्या level ला जबाबदार असते.
काम योग्य त-हेने होण्यासाठी, माणसाची क्षमता, दर्जा, कामाची समज, कौशल्य व तालिम तर जरुरी असेलच पण याहूनही महत्त्वाची गोष्ट आहे. व्यवस्थापनाच्या विविध घटकांवरचा परस्पर विश्वास – जी ‘जबाबदारी’ च्या नाण्याची दुसरी बाजू आहे.
‘काम नक्की होणार’ असा एखाद्यावर विश्वास (भरवसा) ठेवणे हे एखाद्या (अलिखित) कराराप्रमाणे आहे. म्हणूनच एकदा अशा भरवशाच्या म्हशीच्या टोणगा झाला ( म्हणजे विश्वास ठेवूनही एखाद्याने काम केले नाही ) तर ते ( विश्वासाच्या ) कराराचा भंग केल्यासारखे आहे.
व्यवस्थापकीय भाषेत विश्वास म्हणजे ‘काम अमूकअमूक कडून होणारच’ हा भरवसा ही ‘विश्वासहर्ता’ या अर्थाने कामसापेक्ष आहे. या संदर्भात ही ‘विश्वासहर्ता’ नीतिमत्तेशी निगडीत नाही. अर्थात बाहेरच्या जगात नीतिमत्तेत चोख नि विश्वासपूर्ण असणारा माणूस व्यवस्थापकीय संदर्भात ‘विश्वासपात्र’ होईलच असे नाही. याचा contrast ही सत्य असू शकतो. अर्थात अशीही माणसं असू शकतात जी दोनही अर्थाने विश्वासपात्र व दोनही संदर्भात अविश्वासपात्र असू शकतात. या लेखात ‘विश्वास’ हा एक स्वभावगुण असण्यापेक्षा क्षमतेचा भाग म्हणून वापरला आहे.
मूलभूत बौध्दिक क्षमतेची आपल्या देशात फारशी वानवा नाही. कमतरता आहे ती काम करण्याच्या शिस्तीची. क्षमता असण्यापेक्षा आपल्याकडील किती क्षमतेचा आपण किती व कसा वापर करतो (aplication) नि बाष्फळ बडबड किती करतो हा आपल्या देशाचा मुलभूत Problem आहे. बौध्दिक क्षमता नि काम करण्याची शिस्त या गोष्टी गुण्यागोविंदाने सहनिवास करतांना सहसा दिसत नाहीत. या संदर्भात प्रामुख्याने आपल्या देशात, एखादा माणुस दिलेली जबाबदारी न चुकता पूर्ण करेलच अशी खात्री नि अशाप्रकारे आपण त्या माणसावर अवलंबून राहू शकतो असा विश्वास जो आपल्याला देऊ शकेल त्याच्या दृष्टीनेही कारण अशा विश्वासपात्रतेच्या शिडीवरुनच त्याच्या व्यावसायिक कारकिर्दीचा विकास होऊ शकतो. हे विश्वासाचं नातं स्थापित होणे ही आजच्या युगात महत्त्वाचे आहे नि याच अर्थाने ‘विश्वास’ शब्द इथे वापरला आहे.
सांगितलेलं किंवा ठरवलेलं काम तसं किंवा वेळेत झालं नाही तर पाठपुरावा (follow up) करावा लागतो. हा पाठपुरावा करण्यात वेळ व शक्ती (energy) खर्च करावी लागते. जी, जर कामं योग्य प्रकारे झाली, अनावश्यक असते, वेळेचा अपव्यय होतो.
या व्यतिरीक्त ज्या व्यक्तीचा पाठपुरावा केला जातो (कामानिमीत्ताने), सर्वसाधारणपणे त्याला तो फारसा आवडत नाही. कारण जरी कामाबाबतीत माणूस दिला असला तरी कुणी (कामासाठी) आपल्या पाठी लागावं हे ब-याच लोकांच्या अहंकाराला पचनी पडत नाही. आपल्या क्षेत्रात अतिक्रमण केल्यासारखं वाटतं. एकंदरीत या पाठपुरावा करण्यात ताणतणाव होण्याची शक्यता असते. (आपल्या कार्यक्षमतेवर अविश्वास दाखवल्यासारखं वाटतं.) यामुळे पाठपुरावा करणा-याच्या मनात चलबिचल होते (पाठपुरावा करावा का? किती करावा?) या सर्व प्रकारांमुळे मनावरचा दाब (pressure) मनस्ताप वाढून कामावर परिणाम होण्याची शक्यता वाढते. यामुळे व्यवस्थापकीय कामात ‘विश्वासाचं नातं’ असण्याचं महत्व तुमच्या लक्षात येईल.
हा ‘विश्वास’ असण्याचे फायदे पहा :
पाठपुरावा करण्याचा वेळ वाचतो नि हा वाचलेला वेळ कंपनीच्या भवितव्याशी निगडीत अशा अनेक उपयोगी कामांसाठी वापरण्यास खुला (unlock) होतो. ठरवलेली कामे होणारच हा विश्वास आल्याने काम होतील की नाही या विषयीची अनिश्चितताही नाहीशी होते म्हणजे मनही चिंतारहीत होतात. आणि या सलग्न असलेले ताण- तणाव नाहीसे होऊन आयुष्यावर व परस्परसंबंधावर निरोगी परिणाम होतो.
हे ‘विश्वासाचं नातं’ तीन level वर काम करतं.
१. खालच्या दिशेने : व्यवस्थापक किंवा नेत्याला आपल्या लोकांवर विश्वास ठेवणं, त्याच्याकडून चांगलं काम करुन घेण्यासाठी जरुरी असतं. आपल्या नेत्याचा आपल्यावर विश्वास आहे तो आपल्या पाठीशी आहे ही भावना team मध्ये असणं जरुरी असतं या आत्मविश्वासानेच ते कामाबरोबर आव्हानांबरोबर टक्कर घेऊ शकतात.
२. वरच्या दिशेने : नेत्याने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्याचं कर्तव्य team चं असतं. आपल्यावर सोपलेलं काम योग्यप्रकारे, योग्य वेळात पार पाडून हा विश्वास सार्थ करायचा असतो.
३. आजूबाजूला : team मध्ये काम करणा-या सहका-यांमध्ये सुध्दा परस्पर विश्वास असणं जरुरी असतं. असं विश्वासाचं नातं असलं तर प्रयत्नांमध्ये synergy येते. प्रयत्न एकमेकांना छेदत नाहीत. काम हा एक आनंदसोहळा होतो. orchestra मधील symphony सारखं आगीशी किंवा अचानक कोसळलेल्या संकटाशी झगडणा-या विस्कळीत जमावासारखं नाही. न…
यतीन सामंत
Source : (Click here)
Source : (Click here)