नमस्कार रसिकहो
आयुष्याच्या या धावपळीत, जेव्हा मन थकव्याने व्याकुळ होते, तेव्हा त्याला सावरणारे आणि पुन्हा नवचैतन्याची फुंकर घालणारे काही क्षण हवे असतात… चला तर मग, शब्दांच्या या अथांग सफरीवर!
स्वयंसिद्धा फाउंडेशनच्या ‘जागर कवितेचा’ या काव्य स्पर्धेला उभ्या महाराष्ट्राने आपल्या प्रतिभेने न्हाऊ घातले. शब्दांच्या या महाकुंभात उमललेल्या असंख्य कवितांमधून निवडलेल्या काही मोजक्या आणि दर्जेदार कवितांचे सुरेल ‘कवी संमेलन’ आपण येत्या १ मे रोजी आयोजित केले आहे.
शब्दांचे हे लेणे, भावनांचा हा कल्लोळ आणि कवितांच्या या मैफिलीत आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे. आपल्या उपस्थितीने या काव्य-सोहळ्याची शोभा द्विगुणित होईल आणि सुजाण रसिक म्हणून आपल्यालाही या शब्दवेल्हाळ कवितांचे तृप्त रसग्रहण करता येईल.
या, कवितेच्या या अलौकिक सोहळ्यात सहभागी व्हा!
झूम :
Topic: जागर कवितेचा – महाराष्ट्र दिन विशेष काव्यमहोत्सव
Time: May 1, 2026 04:00 PM India
Join Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/88464180007?pwd=466WUv7IRFrLf1buAIhBpH4a7m5QmE.1
Meeting ID: 884 6418 0007
Passcode: 836791
सदारच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण YouTube वर देखील होणार आहे. त्यासाठी आमचे चॅनल subscribe करा
https://www.youtube.com/@swayamsiddhafoundation
आपण ही लिंक आपल्या ओळखीच्या मंडळींना देखील फॉरवर्ड करू शकता.